अलंकापुरीची कचराकुंडी मुक्‍तीकडे वाटचाल

आळंदी- उभ्या महाराष्ट्रला तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेली श्रीक्षेत्र अलंकापुरीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून त्याच्या दुप्पटीने कचरा वाढत आहे. अशाही परिस्थितीवर मात करीत वेळोवेळी कचरा उचला जात असून स्वच्छ सुंदर आळंदीकडे शहराची वाटचाल सुरू आहे. याचा एक भाग म्हणून सध्या अलंकापुरी कचरा कुंडी मुक्‍तीकडे वाटचाल करीत आहे.
तीर्थक्षेत्र अंलकापुरीत दररोज 15 ते 20 टन कचरा तयार होतो. तसेच यात्राकाळात अतिरिक्त कचऱ्याचा भार पडतो. तरी हा कचरा वेळच्यावेळी उचलणे, त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे, नागरिकांसह भाविकांच्या तक्रारी येऊ न देणे, ओला व सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण करणे, स्वच्छ भारत अभियानास प्रतिसाद देणे व जास्तीत जास्त शहर स्वच्छ ठेवून आळंदीकरांसह भाविकांचे आरोग्य जपणे हे फार मोठे आवाहन नगरपरिषदेसमोर असताना या सर्व गोष्टींना सावरत आळंदी नगरपालिकेने हे आवाहन स्वीकारले आहे. स्वच्छतेचा ध्यास घेतलेले मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, सर्व नगरसेवक-नगरसेविका, आरोग्य सभापती पारूबाई तापकीर, आरोग्य अधिकारी शितल जाधव, एस. आय. महेश रूपनवर, मुकादम मालन पाटोळे व गोपाल मोहरकर यांनी आजवर कचरा उचलण्याचे सुयोग्य नियोजन केले आहे. त्याशिवाय आळंदीकरांसह भाविकांना आश्‍चर्याचा धक्का देत शहरातील 20 ते 22 कचराकुंड्या हलवून यापुढील काळात संपुर्ण अलंकापुरी ही कचराकुंडी मुक्‍त करण्याचा त्यांचा संकल्प आहे. स्वच्छ भारत अभियानास प्रतिसाद देत त्यांनी स्वच्छतेची जादुचीछडी आळंदीकरांना दाखविली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या या स्वच्छेतेच्या कामात पांडुरंग सोनवणे, नितीन व मुन्ना शेलार या तीन सहकाऱ्यांच्या भरीव अशा मदतीनेच शक्‍य झाले असल्याचे गोपाल मोहरकर यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)