अर्बन बॅंकेच्या प्रगतीचे लक्ष पूर्ण करतांना आनंद होत आहे

नगर – स्वातंत्र्यपूर्व काळापासून अर्थ क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारी अर्बन बॅंक आहे. या बॅंकेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. अत्याधुनिक सेवा देण्याबरोबरच सभासदांचे समाधान साधून बॅंकेच्या प्रगतीचे लक्ष पूर्ण करतांना आनंद होत आहे. सभासदांना 10 टक्के लाभांश देण्यास रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिली होती. मात्र 15 टक्क्‌यांसाठी सातत्याने आग्रही भुमिका घेत पाठपुरवठा केल्याने 15 टक्के लाभांश मंजूर झाला, त्यामुळे लाभांष वाटपास दिरंगाई झाली. आजच्या गणतंत्राच्या शुभदिनी बॅंकेच्या सभासदांना लाभांश वाटप करतांना अत्यांनंद होत होत आहे, हा दुग्धशर्करा योगच आहे, असे प्रतिपादन नगर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर अर्बन बॅंकेच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष खा.दिलीप गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर बॅंकेच्या विविध क्षेत्रातील सभासदांना लाभांश वाटप झाले. यावेळी माजी उपाध्यक्ष शैलेश मुनोत, संचालक अनिल कोठारी, दिपक गांधी, ऍड.केदार केसकर,अजय बोरा, मनेष साठे, सह.प्रमुख व्यवस्थापक सतीश शिंगटे, वरिष्ठ अधिकारी सतीश रोकडे, एम.पी.साळवे, डि.के.साळवे, मनोज फिरोदिया, राजेंद्र डोळे, राजेंद्र मुनोत, हेमंत बल्लाळ, कुबेर प्रथमशेट्टी, बॅंकेचे सभासद व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.एम.कांबळे, कुतुबुद्दीन जनाब, श्री.पिपाडा, धर्मराज औटी गुरुजी आदिंसह बॅंकेचे विविध क्षेत्रातील सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)