अर्बनमधील अफरातफरीची सुनावणी 15 डिसेंबरला

लेखापरीक्षक न आल्याने जिल्हा न्यायालयाने दिली पुढची तारीख

नगर: नगर अर्बन बॅंकेतील आर्थिक अफरातफर प्रकरणाची पुढील सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे. लेखापरीक्षक हजन न झाल्याने ही सुनावणी पुढील तारखेला घेण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. अर्बन बॅंकेतील आर्थिक अफरातफर प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहे. या प्रकरणाची नेमकी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुनावणी सुरू झाल्याने बॅंकेचे अध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

-Ads-

भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. बॅंकेतील आर्थिक व्यवहारात 1 कोटी 75 लाख रुपयांची अफरातफरी झाल्याचे हे प्रकरण आहे. न्यायालयात या प्रकरणात वैधानिक लेखापरीक्षकाची साक्ष होणार होती. मात्र लेखापरीक्षक हजर न झाल्याने पुढील तारीख देण्यात आली आहे. ही सुनावणी आता 15 डिसेंबरला होणार आहे. अर्बन बॅंकेचे राधावलब कासट, अशोक बोरा, मदन बाफना, राजेंद्र गांधी, दीपक गांधी, शैलेश मुनोत, बॅंकेच्या मुख्यकार्यकारी नवनीत गांधी, ऍड. अभय आगरकर आदींसह आजीमाजी संचालक उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)