अर्पित, रवि, दीक्षांत, संतोष मुख्य फेरीत

 

दुसरी राजाभाऊ करंडक पीवायसी-ग्रीन बेझ खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे आयोजित दुसऱ्या राजाभाऊ शहाडे करंडक पीवायसी-ग्रीन बेझ खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धेत अर्पित शहा, रवि साटोरे, दीक्षांत ननावरे, संतोष धर्माधिकारी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या स्पर्धेत मुंबईच्या अर्पित शहा याने पुण्याच्या इद्रीस कुरेशी याचा 74-14, 36-50, 100-01 असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरी गाठली. वाकड येथील रवि साटोरे याने पुना क्‍लबच्या पंकज परमार याचा 56-33, 33-61, 46-30 असा पराभव करून विजयी सलामी दिली.

साताराच्या दीक्षांत ननावरे याने पुण्याच्या यशवंत कसबे याचा 35-44, 78-17, 60-38 असा निसटता विजय मिळवत स्पर्धेची मुख्य फेरी गाठली. डेक्कन जिमखानाच्या संतोष धर्माधिकारी याने ऋतुराज जोराग याचा 36-64, 54-30, 54-23 असा पराभव करून आगेकूच केली.
रणजीत नेगी, सुमित सारडुलकर, सौविक मलिक, ऋषभ गोहील, वेदांत जोशी, विवेक मेहेत्रे व शुभम रंधेयांनीही पात्रता फेरीत विजय साकारत मुख्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः पात्रता फेरीः
अर्पित शहा (मुंबई) वि.वि. इद्रीस कुरेशी (पुणे) 74-14, 36-50, 100-01; रवि साटोरे (वाकड) वि.वि. पंकज परमार (पुना क्‍लब) 56-33, 33-61, 46-30; रणजीत नेगी (वाशी) वि.वि. दिपक गलेहोत (पुणे) 73-39, 55-47; दिक्षांत ननावरे (सातारा) वि.वि. यशवंत कसबे (पुणे) 35-44, 78-17, 60-38; सुमित सारडुलकर (मुंबई) वि.वि. भावेश जैन (खडकी) 41-25, 71-45; सौविक मलिक (मुंबई) वि.वि. नितेश माने (पुणे) 57-18, 54-36; ऋषभ गोहील (मुंबई) वि.वि. सचिन तापकीर (पुणे) 63-26, 66-06; वेदांत दोशी (आरसीबीसी) वि.वि. आशिष हुले (खडकी) 50-34, 61-49;विवेक मेहेत्रे (पुणे) वि.वि. अजिंक्‍य खालकर (पुणे) 56-31, 62-19; शुभम रंधे (पुणे) वि.वि. संजय ताटके (डेक्कन जिमखाना) 56-12, 61-23; संतोष धर्माधिकारी (डेक्कन जिमखाना) वि.वि. ऋतुराज जोराग (पुणे) 36-64, 54-30, 54-23.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)