अर्धा किलो सोने, 25 लाखांची रोकड नक्षलवाद्यांकडून जप्त

रांची -झारखंडमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्याकंडून तब्बल अर्धा किलो सोने आणि 25 लाख रूपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. नक्षलवाद्यांचा म्होरक्‍या सुधाकर कंत्राटदाराकडून खंडणी उकळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

खंडणीची रक्कम घेण्यासाठी दोन नक्षलवादी झारखंडची राजधानी रांचीमध्ये येणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी बुधवारी त्यांना सापळा रचून पकडले. बी. नारायण आणि सत्यनारायणन रेड्डी अशी त्यांची नावे आहेत. नारायण हा सुधाकरचा भाऊ तर सत्यनारायणन हा सुधाकरचा व्यावसायिक भागीदार असल्याचे समजते. ते दोघेही तेलंगणमध्ये सक्रिय असणाऱ्या माओवादी नक्षलवाद्यांच्या गटाचे सदस्य आहेत. त्यांची अटक पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)