अर्धवट पुलाच्या पूर्णत्वासाठी गावकऱ्यांचा लढा

सांगुर्डीमधील उपोषणाचा दुसरा दिवस

देहुरोड – सांगुर्डी (ता.खेड) येथील गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या पुलाचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ता वसंत भसे यांनी महादेव मंदिरात आमरण उपोषणाला महात्मा गांधी जयंतीनिमित्त सुरवात केली आहे.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष मयुर मोहिते, रामकृष्ण टाकळकर, सांगुर्डी गावच्या सरपंच चंद्रकला गावडे, ग्रामपंचायत सदस्य दिनकर भसे, उज्वला चव्हाण, पूजा भसे, येलवाडी गावचे माजी सरपंच नितीन गाडे, मारुती भसे, बाजीराव गायकवाड, कृष्णा परंडवाल, तानाजी काळे, कैलास भसे, अशोक मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या आठ वर्षांपासून येथील इंद्रायणी नदीवरील सांगुर्डी, बोडकेवाडी गावांना जोडणारा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र या पुलाचे अद्यापही काम पूर्ण झाले नाही.अर्धवट असलेला पूल नदी पात्रातच संपवला आहे. या पुलाचा आराखडा, संपूर्ण माहिती, निधीबाबत ग्रामस्थांना माहिती दिली जात नाही.

नदीपात्राच्या पुराची पूर्ण माहिती घेऊन पुलाचे काम करावेत, सांगुर्डी गावाच्या बाजुला किमान आणखी दोन, तीन मोऱ्या बांधण्यात याव्या, नंतरच पुलाला रस्ता भराव घालुन जोडवा, संबधित ठेकेदाराच्या नावाचा फलक लावावा. कामाची मंजुरी व काम कधी पूर्ण होणार खर्च, निधी या संबंधिताची माहिती असलेले फलक तातडीने लावावेत या मागणीसाठी भसे यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला तालुक्‍यातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)