अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

नगर, दि. 18 (प्रतिनिधी) – औरंगाबाद रस्त्यालगत हॉटेल सिंहगडशेजारी अनोळखी पुरुषाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती समजताच एसपींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नगर-औरंगाबाद हायवेलगत हॉटेल सिंहगडशेजारी अर्धवट जाळून टाकलेला अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मयताचे अंदाजे वय 35 वर्षे, गुलाबी रंगाचा फूल बाह्या असलेला शर्ट, काळ्या रंगाची फूल पॅन्ट, पांढरे बनियन, लाल रंगाचा करगोटा, पॅरागॉन कंपनीची चप्पल आढळून आली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस निरीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील, नगर ग्रामीणचे उपअधीक्षक आनंद भाईटे, एमआयडीसीचे साहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)