अर्थ सत्तेसाठी युवकांनी उद्योगांकडे वळावे!

निगडी – संतांनी दाखवलेल्या मार्गावरून जीवन प्रवास करताना सर्व बाजूंनी समाजाचा विकास होणे आवश्‍यक आहे. पूर्वी धर्माला राजाश्रयाची गरज होती. सध्या स्थिती बदलली आहे. उद्योग-व्यवसाय ज्यांच्या हातात आहेत, त्यांच्याकडेच अर्थ व्यवस्थेचा ताबा आहे. त्यामुळे युवकांनी अर्थकारणात पुढे येऊन स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारावेत. जेणेकरून अर्थसत्ता तुमच्या ताब्यात येईल आणि त्या माध्यमातून तुम्ही समाजाचा विकास करू शकाल, असे मार्गदर्शन ज्येष्ठ उद्योजक राजेश सांकला यांनी केले.

पवित्र चातु:मासनिमित्त कोटा संघ प्रमुख नवकार आराधिका प.पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांना निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि अखिल भारतीय जैन सोशल ऑर्गनायझेशन (जेएसओ) यांच्या वतीने “महाराष्ट्र सिंहनी’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्वागताध्यक्ष मनोहरलाल लोढा, निमंत्रक नितीन बेदमुथा, जेएसओचे शहराध्यक्ष तुषार मुथा, कार्याध्यक्ष पवन लोढा, संतोष कर्नावट, मनोज सोळंकी, संतोष धोका, सुभाष ललवाणी, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजेंद्र जैन, विनोद मुथा, महाराष्ट्र व देशरातून आलेले जैन बंधू-भगिनी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते. प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू. गरिमाजी म.सा., प.पू. महिमाजी म.सा. यावेळी उपस्थित होते.

-Ads-

राजेश सांकला म्हणाले की, स्पर्धेच्या युगात युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग व्यवसायात यावे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने (जितो) अशा युवकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठावरून युवा उद्योजक आणि व्यावसायिक जागतिक स्पर्धा करू शकतात. स्पर्धेत टिकायचे असेल तर संघटन महत्त्वाचे आहे. युवक संघटीत झाल्यास समाज संघटीत होईल. हे संघटन तुम्हाला यशाचे शिखर गाठून देईल.
मनोहरलाल लोढा म्हणाले, अर्थसत्ता ज्याच्याकडे आहे, तो आजच्या जगात यशस्वी म्हणून ओळखला जातो. धर्माचरण करताना अर्थकारणही केले पाहिजे. अर्थ व्यवस्था आपल्याला उमगली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणे आवश्‍यक आहे.

निमंत्रक नितीन बेदमुथा प्रास्ताविकात म्हणाले, संतांचा आशिर्वाद महत्त्वाचा आहे. समाजाला मार्ग दाखवण्याचे महान कार्य संत करतात. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या बाबी घेऊन आपण विकासाचा मार्ग चोखाळला पाहिजे. स्व-विकासासह समाजाची प्रगती कशी होईल, याबाबतही चिंतन झाले पाहिजे. त्यासाठी एका छताखाली सर्वांनी एकत्र यावे. जितोच्या इंटरनॅशनल आणि पिंपरी- चिंचवड शहर शाखेच्या कार्याचे सादरीकरण करण्यात आले. जितोचे कार्य कसे चालते, याबाबत यावेळी माहिती देण्यात आली. शारदा चोरडीया यांनी सूत्रसंचालन केले. तुषार मुथा यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)