‘अर्थ अवर’: ‘या’ मुख्यमंत्र्यांनी घेतली मेणबत्तीच्या उजेडात बैठक

भोपाळ : पृथ्वीच्या संरक्षणाविषयी संवेदनशीलता वाढवण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘अर्थ अवर’मध्ये  शनिवारी अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शनिवारी सायंकाळी अनेकठिकाणी एक तासासाठी वीज गायब झाली होती. यात राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी देखील एक तास वीज गायब होती.

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात आपल्या महत्त्वाच्या बैठका पार पाडल्या. भोपाळ येथे शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. यावेळी शिवराजसिंह यांनी आपल्या निवासस्थानी मेणबत्तीच्या उजेडात उच्च अधिकाऱ्यांशी बैठक घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)