अर्थिक फसवणूक व बलात्कारप्रकरणी चौघांवर गुन्हा

कराड, दि. 22 (प्रतिनिधी) -पुणे येथील 40 वर्षीय महिलेची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तीन संशयितांसह एका प्राध्यापकाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आकाश सावंत (रा. कराड), गणेश गोडसे (रा. विद्यानगर, कराड), अनिल थोरात (रा. नडशी, ता. कराड), प्राध्यापक संपत अडसूळ (रा. विद्यानगर, ता. कराड), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयीत आकाश सावंत, अनिल थोरात, अडसूळ या तिघांना दि. 23 पर्यंत कोठडी मिळाली आहे.
पीडित महिलेचे पती 2007 पासून ते बेपत्ता आहे. आक्टोंबर 2016 मध्ये महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्या महिलेची ओळख गणेश गोडसेशी झाली. गोडसे याने तिला तुमच्या अडचणी सोडवतो, असे सांगून तिच्यावर विद्यानगर येथे अत्याचार केला. तसेच महिलेकडून रोकड आणि 40 तोळे सोने घेऊन ते मोडले. गोडसे याने महिलेची प्रा. संपत अडसूळ याच्याशी ओळख करून दिली. प्रा. अडसूळने वडील आजारी असल्याचे सांगून महिलेकडून 2 लाख रूपये घेतले. वेगवेगळ्या कारणांनी आकाश सावंत, अनिल थोरात यांनी त्या महिलेची भेट घेऊन बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)