अर्थसहाय्याच्या अपेक्षेने इम्रान खान संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये 

दुबई: पाकिस्तानला अर्थसहाय्य मिळावे या अपेक्षेने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये दाखल झाले आहेत. देशातील तीव्र आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे.

इम्रान खान गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये आले आहीत. त्यांनी आबुधाबीचे युवराज आणि अमिरातीच्या लष्कराचे उपाध्यक्ष शेख मोहम्मद बिन झ्यायेद यांची राजप्रासादामध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्या समवेत विदेश मंत्री शाह मेहमूद कुरेशी आणि अर्थ मंत्री असाद उमर यांच्यासह अन्य अधिकारीही उपस्थित आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला अर्थसहाय्य करण्यासाठी कधी नव्हे त्या कठोर अटी घातल्या आहेत. त्यामुले अर्थसहाय्य तात्काळ मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अमिरातीकडून तात्काळ 6 अब्ज डॉलरचे सहकार्य मिळवणे हा इम्रान खान यांच्या भेटीचा प्रमुख उद्देश आहे. रोख ठेवी आणि तेलाच्या स्वरुपात ही मदत मिळावी, अशी पाकिस्तानची अपेक्षा आहे. पाकिस्तान आणि युएईमध्ये अर्थसहाय्याच्या पॅकेजबाबत दोन सामंजस्य करार होण्याची शक्‍यता असल्याचेही समजते आहे.

-Ads-

गेल्या महिन्यात सौदी अरेबियावरून परत येत असतानाही इम्रान खान दुबईमध्ये थांबले होते. या महिन्याच्या सुरुवातीला इम्रान खान यांनी चीनलाही भेट दिली आहे. चीनने पाकिस्तानला 6 अब्ज डॉलरची मदत करण्याचे मान्य केले असल्याचे समजते आहे. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानला 12 अब्ज डॉलरची तूट आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)