अर्थसंकल्प २०१८ : आरोग्य क्षेत्राला अपेक्षा भरीव तरतुदींची (भाग- १ )

लसीकरण, बालमातामृत्यूदर, कुपोषण, सकस आहार, ज्येष्ठांचे आरोग्य, मधूमेह, हदयरोगाचे वाढते प्रमाण कर्करोग यांसारख्या गंभीर आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक उपचार उपलब्ध असले तरी ते सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असल्याने 90 टक्के रुग्ण हे सरकारी रुग्णालयातील उपचारावरच अवलंबून असतात. यादृष्टीने सरकारला सरकारी व्यवस्था अधिकच बळकट करणे क्रमप्राप्त ठरत आहे. म्हणूनच आगामी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राच्या तरतूदीत वाढ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भारतातील आरोग्य व्यवस्था प्रचंड व्यापक आणि विस्तारित आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य यंत्रणा अपुरी असूनही दरवर्षी या क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली जात नाही. अर्थसंकल्पीय तरतूद कागदावर मोठी दिसत असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत ती अगदीच तुटपूंजी दिसून येते. लसीकरण, बालमातामृत्यूदर, कुपोषण, सकस आहार, ज्येष्ठांचे आरोग्य, मधूमेह, हदयरोगाचे वाढते प्रमाण कर्करोग यांसारख्या गंभीर आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे गरजेचे आहे.

-Ads-

आज भारतात अत्याधुनिक उपचार उपलब्ध असले तरी ते सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असल्याने 90 टक्के रुग्ण हे सरकारी रुग्णालयातील उपचारावरच अवलंबून असतात. यादृष्टीने सरकारला सरकारी व्यवस्था अधिकच बळकट करणे क्रमप्राप्त ठरत आहे. म्हणूनच आगामी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राची तरतूद 11 टक्‍क्‍यांनी वाढून 52295 कोटी रुपये होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

केंद्र सरकार बालमाता मृत्यू दरावरून गंभीर असून त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठीच्या तरतुदीमध्ये सुमारे 25 टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. स्तनदा माता आणि अर्भक मृत्यूदरात घट आणण्यासाठी लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि गर्भवतींच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी सरकार काम करत आहे. कुपोषित बालकांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गर्भवतीची देखभाल ही रुग्णालयातच प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत व्हावी अशी सरकारची अपेक्षा आहे. याबाबतही अर्थसंकल्पातून विचार होणार आहे.

गेल्या काही वर्षात गरोदर माता आणि बालकांच्या जन्मदरात सुधारणा होत आहे. भारत सतत विकासाचे ध्येय साध्य करण्याकडे वाटचाल करत आहे. दुसरीकडे संसंर्गजन्य रोगांवर आणि आजारावर मात करण्यासाठी उपचार पद्धतीत सुधारणा होत आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे 25 टक्के वाढीची अपेक्षा आहे. सध्या यासाठीची तरतूद 21 हजार कोटींची आहे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)