अर्थसंकल्प मंजुरीला मुहुर्त लाभेना!

उपसूचनांचा पाऊस : अर्थसंकल्पीय सभा चौथ्यांदा तहकूब

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पावर नगरसेवकांनी उपसूचनांचा पाऊस पाडला. वाढलेल्या उपसूचनांमुळे अर्थसंकल्प मंजुरीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्थसंकल्पीय सभा शुक्रवारी (दि.23) चौथ्यांदा तहकूब करण्यात आली.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचा आगामी 2018-19 या आर्थिक वर्षांचा एकूण 5 हजार 235 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प 15 फेब्रुवारीला स्थायी समितीपुढे सादर झाला. स्थायी समितीने चर्चा व 27 कोटी रुपयांची वाढ करत 5 हजार 262 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला. तो 26 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय विशेष सभेपुढे सादर करण्यात आला. त्यानंतर सभा तहकूब करून 9 मार्चला घेण्यात आली. ही सभा पुन्हा तहकूब करून 20 मार्चला बोलविण्यात आली.

अर्थसंकल्पावर 20 मार्चला दोन टप्प्यात सात तास चर्चा झाली. त्यानंतर सुमारे 300 कोटी रुपयांच्या 729 उपसूनचा नगरसेवकांनी अर्थसंकल्पात घुसविल्या. त्यानंतर सभा बुधवारपर्यंत (दि. 23) तहकूब करण्यात आली. उपसूचना ग्राह्य-अग्राह्य करून बुधवारी अर्थसंकल्प मंजूर होणे अपेक्षित होते. मात्र, अर्थसंकल्प मंजूर न करता सभा तहकूब करण्यात आली. ही अर्थसंकल्पीय सभा चौथ्यांदा तहकूब झाली असून येत्या मंगळवारी (दि. 27) दुपारी दोन वाजता सभा होणार आहे.

या संदर्भात सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, अर्थसंकल्पात अनेक उपसूचनांचा समावेश असून त्याची पडताळणी सुरु आहे. घाई-गडबडीत मंजुरी न देता उपसूचनांचा अभ्यास करून मंजुरी दिली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)