अर्थसंकल्प जाहीर झाला तरी त्याचा उपयोग होणार नाही- जयंत पाटील

लवकरच निवडणुका जाहीर होतील आणि आचारसंहिता जाहीर झाली की, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणारच नाही.

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा आज साताऱ्यात दाखल झाली. पहिली सभा रहिमतपूर येथे झाली. दरम्यान  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.

-Ads-

जयंत पाटील म्हणाले, लवकरच अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. हा अर्थसंकल्प नसून सामान्य जनतेची फसवणूक असेल. अर्थसंकल्प जाहीर झाला तरी त्याचा उपयोग होणार नाही. कारण लवकरच निवडणुका जाहीर होतील आणि आचारसंहिता जाहीर झाली की, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणारच नाही.

भाजपा सरकार अनेक योजनांची घोषणा करते आहे. पण तिजोरीत पैसाच नाही. भाजपाने अनेक प्रकल्पांची घोषणा केली. पण आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय तर एकही नवा प्रकल्प दिसत नाही. सरकारमधील लोक फक्त कुदळ-फावडे मारून निघून जातात, असा आरोपही पाटील यांनी केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)