अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन

नवी दिल्ली – संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनामध्ये सर्व विधेयकांबाबत चर्चा करून मंजूरीसाठी सहमती मिळवण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये केला जाण्याची शक्‍यता आहे. सरकारच्यावतीनेही उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली आहे. यावेळी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये विविध मुद्दयांवर विचारांची आदान प्रदान होण्याची शक्‍यता आहे. या अधिवेशनामध्ये तिहेरी तलाकसारख्या मुद्दयांवर सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार संघर्षाची शक्‍यता आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 29 जानेवारी पासून 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या कालावधीमध्ये सरकारच्यावतीने आर्थिक सर्वेक्षण अहवाल 29 जानेवारीरोजी मांडला जाणार आहे. तर 1 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थ संकल्प सादर केला जाणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वीचा भाजप आणि एनडीए सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्प असेल. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. 9 फेब्रुवारीच्या सुटीनंतर संसदेच्या अधिवेशनाचे दुसरे सत्र 5 मार्च रोजी पुन्हा सुरू होईल, ते 6 एप्रिलपर्यंत चालेल.

-Ads-

या अधिवेशनामध्ये तिहेरी तलाक बंदी विधेयक मंजूर करून घेण्याचा आणि ओबीसी आयोगाला घटनात्मक वैधता मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. तिहेरी तलाक बंदी विधेयकाला लोकसभेची मंजूरी मिळाली आहे, मात्र राज्यसभेमध्ये सरकारचे बहुमत नसल्यामुळे तेथे हे विधेयकर रखडले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)