अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले

पुढील अधिवेशन 4 जुलै 2018 रोजी

मुंबई – गेला महिनाभर सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजाचा आज समारोप झाला. विधानमंडळाचे पुढील अधिवेशन 4 जुलै 2018 रोजी होईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केली.

अधिवेशन कालावधीतील विधानसभेच्या कामकाजाची माहिती देताना अध्यक्षांनी सांगितले की, विधानसभेत एकूण 19 विधेयके मंजूर करण्यात आली असून विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहात 13 विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. या अधिवेशनात विधानसभेच्या एकूण 22 बैठका झाल्या. एकूण 182 तास कामकाज झाले. दररोज सरासरी 7 तास 46 मिनिटे कामकाज झाले. अधिवेशनात विधानसभेत 11 हजार 657 तारांकित प्रश्न प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 5 स्वीकृत करण्यात आले आणि 70 प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली. 23 अल्पसूचना प्रश्न प्राप्त झाले तर त्यापैकी 1 स्वीकृत करण्यात आली.

या अधिवेशनात विधानसभेत 3 हजार 330 लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी 117 स्वीकृत करण्यात आल्या आणि 49 लक्षवेधींवर चर्चा झाली. अर्धा तास चर्चेच्या 397 सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी 148 स्वीकृत करण्यात आल्या आणि त्यातील 6 वर चर्चा झाली. नियम 293 अन्वये 8 प्रस्तावांवर चर्चा झाली. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली. विधानसभेतील सदस्यांची सरासरी उपस्थिती 79.6 टक्के राहिली. जास्तीत जास्त उपस्थिती 89.94 टक्के राहिली तर कमीत कमी 58.20 टक्के राहिली.

यावेळी अध्यक्षांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला आणि त्यानुसार विधान मंडळाचे पुढील अधिवेशन 4 जुलै 2018 रोजी होईल असेही घोषित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)