अर्थसंकल्पातील तरतुदी एप्रिलपासून लागू होणार

नवी दिल्ली  -अर्थसंकल्पातील तरतूद 1 एप्रिलपासून म्हणजे रविवारपासून लागू होणार आहेत. त्यामुळे काही वस्तूवरील कर कमी होणार आहे, तर काही वस्तूवरील कर वाढणार आहेत. त्याचबरोबर शेअरबाजारातील एक लाख रुपयावरील नफ्यावर दीर्घ पल्ल्यातील भांडवली कर म्हणजे सीजीएसटी लागू होणार आहे.

250 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या उद्योगांना आता 25 टक्‍के कंपनी कर द्यावा लागणार आहे. अगोदर हा कर जास्त होता. सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. आता पुढील अर्थसंकल्प नवीन सरकार सादर करणार आहे. सरकारने काही वस्तू आणि सुट्या भागावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे या वस्तू आणि सुट्या मालाचा वापर केलेल्या वस्तू 1 एप्रिलपासून महाग होणार आहेत. त्यात कारचाही समावेश आहे.

देशातील प्रवासी वाहन कंपन्यांनी त्यांच्या विविध वाहनांच्या किमती नव्या वित्त वर्षांपासून वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यानुसार टाटा मोटर्स, निस्सान मोटर यांची वाहने 1 एप्रिलपासून महाग होणार आहेत. किंमतवाढीसाठी कंपन्यांनी उत्पादन खर्चाचे कारण दिले आहे. टाटा मोटर्सच्या विविध प्रवासी वाहनांच्या किमती येत्या महिन्यापासून 60,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहेत. महाग होणाऱ्या वाहनांमध्ये टाटा मोटर्सच्या टिआगो, हेक्‍सा, टिगोर, नेक्‍सॉन या प्रवासी वाहनांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)