अर्थसंकल्पाची तयारी जोमात सुरू…

विविध घटकांशी अधिकाऱ्यांकडून विचारविनिमय
नवी दिल्ली – 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. हा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2017 या दिवशी संसदेत सादर करण्यात येणार आहे. शुक्रवारी त्यांनी वित्तीय क्षेत्रातील नियंत्रकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी आर्थिक सुधारणा, वित्तीय तुटीची स्थिती, बॅंकांची थकबाकी इत्यादी विषयांवर चर्चा करणार आहेत. वित्तीय स्थैर्य आणि विकास मंडळ (एफएसडीसी) हे एक उच्चस्तरीय मंडळ असून त्यात रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर, सेबीचे अध्यक्ष, आयआरडीएआयचे प्रमुख आणि इतर नियंत्रक संस्थांचे प्रमुख यांचा समावेश आहे.

सरकारचा खर्च वाढल्यामुळे वाढत चाललेली वित्तीय तूट हे अर्थमंत्र्यांसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. ती नियंत्रणात ठेवण्यासंबंधी सरकारने घेतलेल्या आतापर्यंतच्या निर्णयांवर या बैठकीत विचार करण्यात आला. मंडळाने अर्थमंत्र्यांसमोर आपले अर्थसंकल्पीय प्रस्ताव ठेवले. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत आर्थिक विकासदर 6.3 टक्के होता. तथापि, या तिमाहीत तो वधारला. यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा बळ येईल अशा अशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्‍यता आहे. तसेच कृषी क्षेत्रावरही भर देण्याची सरकारची योजना आहे. सरकार वित्तीय तूट आणि सरकारी खर्च अशी तारेवरची कसरत अशी पार पाडते यावर बरेच काही अवलंबून आहे, अशी आर्थिक तज्ञांची धारणा आहे. तूट आणि महागाई वाढत असल्यामुळे सरकारच्या अर्थसंकल्पावर बराच परिणाम होण्याची शक्‍यता आहे. अर्थमंत्रालयातील अधिकारी विविध घटकांशीही चर्चा करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)