अर्थशास्त्राच्या पदवीप्राप्तीनंतर…

इकॉनॉमिक्‍स अर्थात अर्थशास्त्र हा सदासर्वकाळ उपयुक्त ठरणारा विषय मानला गेला आहे. अर्थशास्त्राला प्रत्येक काळात आणि परिस्थितीत मागणी राहिलेली आहे. इकॉनॉमिक्‍स हा अत्यंत शिस्तबद्ध आणि रोजगाराभिमुख विषय मानला जातो.अर्थशास्त्र विषयात निपूण असलेल्या उमेदवाराला बाजारात मोठी मागणी आहे. केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवरही अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना मागणी वाढलेली दिसून येते. अर्थविश्‍लेषक, अर्थसंशोधक आणि अर्थसल्लागार अशा मंडळींची जगात आणि देशात नेहमीच मागणी राहिलेली आहे.

अर्थशास्त्रात पदवी घेणाऱ्या उमेदवाराला किंवा विद्यार्थ्याला रोजगाराची फारशी चिंता करण्याची गरज भासत नाही. उत्तम गुण मिळवणाऱ्या, प्राविण्य असणाऱ्या अर्थशास्त्राच्या पदवीधारकाला रोजगारांच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत. सरकारी आणि खासगी क्षेत्रात अर्थशास्त्रपदवीधारकांची गरज भासते. सरकारी पातळीवर अनेक अर्थसेवा देणाऱ्या संस्था असून त्याठिकाणी उमेदवार संधी आजमावू शकतो. अर्थमंत्रालय, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बॅंका, वित्तिय संस्था याठिकाणी दर्जेदार जॉब मिळू शकतो. याठिकाणी मिळणारा जॉब केवळ आपल्याला पैसा देत नाही तर प्रतिष्ठाही प्रदान करते. अर्थविषयक मासिक, वृत्तपत्र, प्रसारमाध्यमे, वाहिन्या याठिकाणीही देखील विश्‍लेषक म्हणून कामाची संधी मिळू शकते. त्यानुसार आपल्याला पैशाबरोबर प्रसिद्धीदेखील मिळू शकते. याशिवाय विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून जॉब मिळू शकतो. बीए इकॉनॉमिक्‍स आणि एलएलबी केल्यानंतर कार्पोरेट कंपन्यात वकील म्हणूनही नेमण्यात येते. बीए इन इकॉनॉमिक्‍स आणि एमबीए पदवी प्राप्त केल्यानंतर खासगी कंपन्यात वरिष्ठ पातळीवरचे स्थान मिळू शकते. इकॉर्नामिक्‍स पत्रकारिता हा देखील प्रसिद्धी देणारा रोजगार मानला जातो.
– स्वाती देसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)