अर्थभान: बॅंकिंग, फार्मा क्षेत्राला भविष्यात चांगले दिवस

7,304 कोटी रुपये
एसआयपीच्या मार्गाने (म्युच्युअल फंड) शेअर बाजारात गेल्या मे महिन्यात आलेला पैसा (एप्रिलपेक्षा9 टक्के अधिक)

2.23 कोटीदेशात सध्या असलेली एकूण म्युच्युअल फंड खरेदीसाठीची एसआयपी खाती

चतुर

ऑगस्ट 2013 मध्ये जवळपास तळ गाठलेल्या शेअरबाजाराने 2017 आणि 2018 च्या सुरवातीला वरच्या दिशेने आगेकूच केली आणि निफ्टी 11,000 ला स्पर्श करू लागला. पण आता ही वाटचाल भक्कम होण्याचा कालावधी असल्याचे मत प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांनी व्यक्त केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेअर बाजारात आपण सगळ्यांनीच तेजीची मोठी चाल पाहिली आणि आता चालू वर्षात निफ्टी 10,000 ते 11,000 च्या दरम्यान राहिला तरी ते चांगले लक्षण असणार आहे. भारतातील स्थानिक पैशाचा ओघ शेअर बाजाराकडे सुरु असून हा ओघ येत्या काळात थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. अगदी राजकीय अनिश्‍चितता देखील बाजारपेठेवर एका मर्यादेपेक्षा जास्त परिणाम करू शकणार नाही. कारण आपला देश किंवा शेअर बाजार कुठल्याही राजकीय पक्षावर अवलंबून नाही. कारण 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 4,600 पर्यंत घसरला आणि नंतर त्यात सुधारणा होत तो 25,000 पर्यंत चढला. त्यामुळे राजकारणाची फार धास्ती घेण्याचे कारण नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

येत्या काळात स्टीलच्या किंमती आताच्या पातळीवर राहिल्या तर टाटा स्टील दमदारपणे वाटचाल करेल असे त्यांना वाटते. त्याचे कारण म्हणजे व्याज, कर, घसारा आणि अन्य जबाबदाऱ्या (ईबीआयटीडीए) वजा करण्यापूर्वीच्या कंपनीच्या कामगिरीत चांगली सुधारणा झालेली आहे.

फार्मा – फार्मा क्षेत्रातील वाईट काळ मागे पडला असून भारतातील ब्रॅंडच्या व्यवसायाबाबत ते आशावादी आहेत. भारतीय औषध उद्योग एका अनोळखी पण उत्साहवर्धक कालखंडात प्रवेश करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या क्षेत्रातील बड्या कंपन्या सन फार्मा आणि ल्युपिन यांनी स्पेशालिटी जेनेरिक्‍समध्ये प्रवेश करून पुढच्या टप्प्यातील वाढीच्या दिशेने वाटचाल सुरु केलेली आहे.

बॅंकिंग – बॅंकिंग क्षेत्रात अभूतपूर्व अशा वाढीला संधी असल्याचे त्यांचे आकलन आहे. सध्या अडचणीतून वाटचाल करणारी आयसीआयसीआय बॅंक येत्या काळात दमदार कामगिरी करेल असा विश्वास त्यांना वाटतो. या बॅंकेसाठी 2019 हे आर्थिक वर्ष दुरुस्तीसाठीचे आणि 2020 साल हे सुस्पष्ट वाढीचे असेल. नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल (एनसीएलटी) आणि इनसॉल्व्हन्सी अँड बॅंकरप्सी कोड (आयबीसी) या कायद्यांमुळे पत शिस्त पाळली जाईल असे त्यांचे मत आहे. या दोन्ही कायद्यांचे दीर्घकालीन फायद्यांकडे लोकांचे दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

आरोग्य विमा – या क्षेत्रात भारतात जबरदस्त वाढीच्या संधी आहेत. येत्या 10-15 वर्षात भारतात आरोग्य विमा क्षेत्राच्या वाढीच्या वेग 20 टक्क्‌यांपेक्षा जास्त असेल.

रिअल इस्टेट – त्यांच्या मते येत्या 203 वर्षात रिअल इस्टेटसाठी खूपच चांगली असतील. रिअल इस्टेटच्या किंमती वाढणार नाहीत पण खप वाढेल. परवडणाऱ्या घरांमुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामांना सध्या कमी जोखले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)