अर्थकारणातील वर्तन आणि गुंतवणुकीचे मानसशास्त्र (भाग-१)

गुंतवणूक म्हणजे तुम्ही मानवी मनाशी व्यवहार करत असता ही गोष्ट लक्षात घ्या. गुंतवणूक करताना किंवा ट्रेडिंग करताना होणारी सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपण माणसांशी व्यवहार करत आहोत याचा विसर पडणे. गुंतवणूक करताना व्यक्तीला भिती, चिंता, अति-आत्मविश्वास वाटतो किंवा हाव वाटत असते. या भावनांचा व्यक्तीच्या गुंतवणुकीसंदर्भातील निर्णयांवर निश्चितपणे प्रभाव पडतो. जर व्यक्तीकडे स्वयंशिस्तीचा अभाव असेल तर या भावनांचा त्याच्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. बहुतेक गुंतवणुकदारांकडे स्वयंशिस्तीचा अभाव असतो आणि त्यामुळे शेअर मार्केटच्या चढउतारावर मूलभूत बाबी आणि बातम्यांमबरोबरच मानसशास्त्रीय गोष्टींचा प्रभाव पडतो.

गुंतवणुकीच्या प्रक्रियेत गुंतवणूक मानसशास्त्र कुठे बसते?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्या कंपनीचे शेअर विकत घ्यायचे आहेत त्या कंपनीचा सर्वसमावेशक अभ्यास करणे म्हणजे रिसर्च असे तुम्हांला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. ज्या कंपनीचे शेअर घ्यायचे आहेत त्यावर प्रभाव टाकणाऱ्या सगळ्या मुद्यांचा विचार केला तरच ती गुंतवणूक यशस्वी किंवा चांगला परतावा देणारी ठरू शकते. त्यामध्ये त्या कंपनीच्या मूलभूत बाबींचा विचार करणे, कंपनीसंदर्भात येणाऱ्या प्रत्येक बातमीवर बारीक लक्ष ठेवायचे, त्या शेअरच्या किंमतीच्या तक्त्यावर लक्ष ठेवायचे आणि त्याचबरोबर भविष्यातील घटनांना शेअर बाजाराकडून कसा प्रतिसाद मिळेल यावर बारकाईने लक्ष ठेवायचे. इथे गुंतवणूक मानसशास्त्राचा खेळ सुरु होतो. एखाद्या घटनेवर शेअर बाजार अवास्तव प्रतिक्रिया व्यक्त करेल किंवा दुसऱ्या एखाद्या घटनेकडे साफ दुर्लक्ष करून वाटचाल सुरु ठेवेल. इथेच चांगल्या संधीची दारे खुली होतात आणि तुम्हांला खरेदी, विक्री, प्रॉफिट बुकिंग, स्टॉप लॉस अशा विविध पोझिशन घेता येतात.

अर्थकारणातील वर्तन आणि गुंतवणुकीचे मानसशास्त्र (भाग-२)

भिती – शेअर बाजारावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा हा मानसशास्त्रीय घटक आहे. भिती ही माणसाला कळपाप्रमाणे वर्तन करायला लावते. एकाने  उडी मारली की, पाठीमागचे धडाधड उडी मारू लागतात.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)