अर्थकारणातील वर्तन आणि गुंतवणुकीचे मानसशास्त्र (भाग-२)

अर्थकारणातील वर्तन आणि गुंतवणुकीचे मानसशास्त्र (भाग-१)

जीव अडकणे – काही जण एखाद्या कंपनीच्या शेअरच्या उगाचच प्रेमात पडतात. काहीजणांनी त्या शेअरमधून आधी नफा कमावलेला असतो म्हणून त्यांचा त्यात जीव अडकलेला असतो. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की, या जगात फक्त बदल ही गोष्ट कायम असते आणि म्हणूनच तुमच्याकडे ज्या कंपनीचे शेअर आहेत त्या कंपनीत अनेक अनुकूल, प्रतिकूल उलाढाली किंवा बदल झालेले असू शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हाव – जेव्हा व्यक्तीच्या मनात हाव निर्माण होते तेव्हा तो कुठलाही हिशेब न मांडता एखाद्या कंपनीचा शेअर चढ्या भावाला घेतो किंवा भविष्यात भरपूर नफा मिळण्याची हाव ठेवून त्या कंपनीचे भरपूर शेअर घेऊन ठेवतो.

आशावाद – जेव्हा मोठ्या संख्येने गुंतवणुकदारांच्या मनात आशावाद निर्माण होतो तेव्हा विनाकारण शेअर बाजार वरच्या दिशेने चढत जातो. परिणामी आपोआपच करेक्शन किंवा बाजार कोसळण्याची शक्यता निर्माण होते.

कळपाचे वर्तन – जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराला असे वाटते की दुसऱ्यापेक्षा आपल्याला कमी माहिती आहे तेव्हा तो कोणताही विचार न करता दुसऱ्याप्रमाणे वर्तन करू लागतो.

गुंतवणूक मानसशास्त्र आणि परतावा वृद्धी

गुंतवणुकीचे मानसशास्त्र कळले की, व्यक्ती भावनिक आधारावर घेतले जाणारे निर्णय टाळते. गुंतवणुकीचे मानसशास्त्र माहित नसले तरी तुम्ही शेअर बाजारात टिकू शकता परंतु ज्याला माहित असते तो तुमच्यापेक्षा जास्त कमाई करतो. गुंतवणूक हा एक ज्ञानावर आधारीत खेळ असतो. तुमच्याकडे जितके जास्त ज्ञान तितकी जास्त तुमची कमाई.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)