अर्जेन्टिनाला दुष्काळाचा फटका; सोयाबीनसाठी अमेरिकेची मागितली मदत

अर्जेन्टिना : दुष्काळाचा फटका बसलेल्या अर्जेन्टिनाने सोयाबीनसाठी अमेरिकेची मदत मागितली आहे. यावर्षी तुटवडा भासण्याच्या शक्यतेने सन १९९७ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात (४.७ लाख मेट्रिक टन) सोयाबीनची मागणी नोंदवण्यात आली आहे.

अमेरिकन कृषि विभागाने म्हटल्यानुसार, २०१८-१९ च्या विपणन हंगामातील (सप्टेंबर-ऑक्टोबर) यादरम्यानच्या मागील काही दिवसांत लॅटिन अमेरिकन देशांना आतापर्यंत २४०,००० टन सोयाबीनची विक्री करण्यात आली आहे.

अमेरिका आणि ब्राझीलपाठोपाठ अर्जेन्टिना हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. या देशात सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून, सोयाबीन खाद्य आणि तेलाची विक्री आंतरराष्ट्रीय बाजारात करतो. हा देश सोयाबीनच्या दोन प्रमुख उत्पादनांची निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांपैकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)