अर्जुन कातारे, गणेश जाधव यांची निवड

चिंबळी-माजगाव (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या संचालकपदी अर्जुन कातोरे व गणेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे माजी चेअरमन खंडू पाटारे यांनी सांगतिले. कातोरे व जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर पांडूरंग जैद, सदस्य पवन पाटारे, आप्पासाहेब बटवाल, माजी उपसरपंच संतोष कातोरे, लक्ष्मण कातोरे, मारूती पाटारे, अरूण जैद, सचिन जाधव, गुरूदास उंबरकर, संतोष बहिरट, विक्रम जैद, ग्रामस्थ व शाळेच्या वतीने अभिनंदन, कौतुक करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)