अर्जुन कपूर शिकतो आहे घोडेस्वारी

आगामी वर्षात अर्जुन कपूर “पानीपत’मधील ऍक्‍शन रोलमध्ये दिसणार आहे. त्या रोलच्या तयारीसाठी तो सध्या घोडेस्वारी शिकतो आहे. सतत काहीतरी शिकत राहिले पाहिजे. शिकणे ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे, असे अर्जुन कपूरने म्हटले आहे. आपल्या घोडेस्वारी शिक्षणाची माहिती त्याने फॅन्सला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर तो घोडेस्वारी शिकायला जातो आहे. तेथील एक फोटो त्याने शेअर केला आहे. त्या फोटोखाली त्याने छानशी कॅप्शनही लिहीली आहे.

नवीन वर्षात नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली आहे. 2018 चा अखेरचा पूरा महिना पशू, प्रकृती आणि सुर्योदयामध्येच घालवला. “पानीपत’च्या शुटिंगदरम्यान अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. घोडेस्वारी शिकायला मिळाल्याने आपण स्वतःला भाग्यवान समजत असल्याचे अर्जुनने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित “पानीपत’ मध्ये कृती सेनन, संजय दत्त हे लीड रोलमध्ये आहेत. मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे ठरलेले पानीपतचे युद्ध का झाले, याची कथा या सिनेमामध्ये मांडलेली असणार आहे. यापूर्वी अर्जुन कपूर परिणिती चोप्राबरोबर “नमस्ते इंग्लंड’मध्ये होता, पण या सिनेमाला विशेष यश मिळाले नव्हते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)