अर्जुन कपूर आणि मलायकाचे अफेअर तेजीत 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खान यांच्या अफेअरची बातमी तशी जुनीच आहे. सिने मॅगझीनमधून आणि गॉसिप गप्पांमधून या अफेअरची चर्चाही झाली आहे. मध्यंतरी काही काळ यासंदर्भात काहीही अपडेट नव्हते. मात्र आता या जोडीचे अफेअर पुन्हा तेजीत असल्याचे समजते आहे. सध्या हे दोघे अगदी खुले आम सगळीकडे लाईफ पार्टनर असल्याप्रमाणे वावरत असतात.

मिलान एअरपोर्टवरचे त्यांचे हातात हात घालून येतानाचे फोटो प्रसिद्ध झाले होते. काही दिवसांनी मुंबई एअरपोर्टवरही दोघे तसेच एकत्र येताना दिसले होते. मलायकाने एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्येही आपल्या नात्याबाबत सूतोवाच केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“इंडिया गॉट टॅलेंट’ या रिऍलिटी शो च्या सेटवर करण जोहरने तर तिला सरळ सरळ प्रश्‍न विचारला होता. “तू इटलीला एकटी गेली होतीस का?’ त्या प्रश्‍नाला उत्तर देण्यापूर्वी मलायकाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून गेले. पण करण पासून काहीही लपवून ठेवता येणार नाही, हे समजून चुकल्यामुळे तिने प्रश्‍नाचे उत्तर वेगळ्या पद्धतीने दिले. “आपण हा प्रश्‍न तसाच अनुत्तरीत ठेवू या.’ असे ती म्हणाली. यच उत्तरात तिला नेमके काय म्हणायचे आहे, ते स्पष्ट होते. आता मलायका आणि अर्जुन यांच्याकडे बघून असे वाटते की लवकरच हे दोघेजण आपल्या नात्याला काही ऑफिशियल नाव देतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)