अर्जुन कपूरच्या “इंडियाज मोस्ट वॉन्टेड’मध्ये नसणार एकही अभिनेत्री

अर्जुन कपूरच्या हातात सध्या अनेक सिनेमे आहेत. त्यातील एक सिनेमा आहे, “इंडियाज मोस्ट वॉन्टेड’, ही एक क्राईम स्टोरी असणार आहे. त्यातील अभिनेत्रींबाबतची बाब विशेष आहे. कारण या सिनेमामध्ये एकही अभिनेत्री असणार नाही. हा सिनेमा गुन्ह्याच्या तपासावर आधारलेला असणार आहे. त्यामुळे डायरेक्‍शनला केवळ याच पैलूवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. अर्जुन कपूर एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिनेमा वास्तवाच्या अधिकाधिक जवळ असायला हवा, अशीच डायरेक्‍टरची अपेक्षा आहे. त्याचसाठी त्यामध्ये कोणीही हिरोईन असणार नाही. अगदी वास्तविक वाटावा, असाच रोल असल्याने अर्जुनही या रोलबाबत खूष आहे. मात्र सिनेमामध्ये एकही हिरोईन असणार नाही. एवढेच नव्हे, तर एकही अभिनेत्री किंवा फिमेल कॅरेक्‍टरही असणार नाही, म्हणून तो थोडासा नर्व्हसदेखील झाला आहे.

-Ads-

हा सिनेमा पुढील वर्षी 24 मे रोजी रिलीज होणार आहे. त्याच्या लग्नाच्या मुद्दयावरूनही त्याने एक खुलासा केला आहे. बहिण अंशुलाचा विवाह झाल्यानंतर तो आपल्या लग्नाबाबत विचार करणार आहे. यासाठी किती वेळ लागेल, हे त्याला सांगता येत नाही. कदाचित 4-5 वर्षेही लागू शकतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)