“अर्घ्य’ने रसिकांची मने जिंकली

पिंपरी – नृत्यशारदा कथ्थक कलामंदिर आयोजित अर्घ्य कथ्थक कार्यक्रमात पदलालित्याने रसिकांनी मने जिंकली. या कार्यक्रमास रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात अर्घ्य या कथ्थक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन नटराज पुजनाने ज्योती शिधये व पायल गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्नेहल सोमण व विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. प्रारंभी पारंपारिक कथ्थक प्रकारात गणेश वंदनानंतर त्रिताल, घन घमंड, नेचर सोग, होरी यांचे विद्यार्थिनींच्या दोन समुहाने सादरीकऱण केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात कथ्थक शैलीतील उपशास्त्रीय नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. “वृंदावनी सारंग हा’, “रेन बो सॉंग’, “तराणा’, “रिबिन डान्स’, “गवळण’, “बरसे बदरिया’, “फ्युजन’ आदी नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. या नृत्यात गुरु स्नेहल सोमण यांच्या समवेत ऋतुजा गोसावी, अनुजा देशपांडे, साक्षी मुजुमदार, नेहा दाते, स्नेहल रोमण, अभिलाषा हरणे, श्रावणी गोसावी, श्रेया ताम्हणकर व इतर विद्यार्थिनीनी नृत्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रिती वाघोलीकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)