अरूणाताईंच्या छंदातून इतरांनाही आनंद देण्याचे काम- अरूंधती महाडिक

कोल्हापूर –  देशविदेशामध्ये भ्रमंती करताना अतिशय आस्थेने संकलित केलेल्या वस्तूंची तितक्याच आत्मीयतेने जपणूक करण्याचे काम अरूणाताई देशपांडे यांनी केले आहे. त्यांच्या या छंदाच्या माध्यमातून इतरांनाही आनंद मिळेल असं प्रतिपादन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी केले. विश्वपंढरीच्या परिसरातील सिंधुनगरीतील पर्यटन अभ्यासिका अरूणाताई देशपांडे यांच्या ‘पथिक’ या संस्थेच्या उद्घघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. सिंधुनगरीत वास्तव करणाऱ्या पर्यटन अभ्यासिका अरूणाताई देशपांडे यांनी त्यांच्या निवासस्थानी ‘गृह संग्रहालय’ संकल्पना साकारली आहे. गेल्या २५ वर्षात ५० देश फिरणाऱ्या देशपांडे यांनी विविध देशातील गणेशाच्या मूर्तींपासून ते भारतातील वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तूंचे संकलन केले आहे. त्याची आकर्षक मांडणीही केली असून रसिकांसाठी  हे संग्रहालय खुले करण्यात आले आहे. कोल्हापुरातीलच कलाकारांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचीही मांडणी येथे करण्यात आली असून त्यातून पर्यटनाला पूरक वातावरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

यावेळी अरूंधती महाडिक यांच्या हस्ते रांगोळीमध्ये रंग भरून आगळ्यावेगळ्या पध्दतीने पथिक या संस्थेचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी अतिशय आस्थेने अरूंधती महाडिक यांनी या संग्रहालयातील विविध मूर्ती आणि कलाकुसरीच्या वस्तूंची माहिती घेतली. तसेच भागीरथी संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालय उपक्रमालाही सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणाहून ग्रंथालयांसाठी प्रस्ताव येत असल्याचे सांगितले. यावेळी अरूणाताई देशपांडे यांनी त्यांच्या वाटचालीविषयी माहिती सांगताना कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे स्पष्ट केले. कोल्हापूरची मराठमोळी संस्कृती, कर्नाटकातील विजापूरची मुस्लिम राजवटीचा प्रभाव असलेली शैली आणि गोव्यातील आधुनिक व पोर्तूगाल प्रभावाची संस्कृती असा पर्यटन त्रिकोण विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी वारणा वडगावकर, अड. श्रध्दा शहा, संजीवनी देशपांडे, स्मिता ओतारी, शुभलक्ष्मी देसाई, अनिता काळे,वीणा सरनाईक उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)