अरूणाचलात लष्कर आणि पोलिसांत चकमक

केंद्रीय मंत्री पातळीवर घेतला गेला आढावा 

बोंबदिला – अरूणाचल प्रदेशात लष्कर आणि पोलिस यांच्यात जोरदार चकमक झाल्याची घटना घडली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घटनेचा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरन रिजीजू यांनी आढावा घेतला आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. पोलिसांशी झालेल्या वादानंतर लष्करी जवानांनी बोंबदिला पोलिस ठाण्यावरच हल्ला करून पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि त्यांनी स्थानकातील सामानाचीही नासधूस केली.

या संबंधात माहिती देताना गृहराज्यमंत्री रिजीजू म्हणाले की, मी स्वत: संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन या घटनेची माहिती घेतली आहे. माध्यमांनी या प्रकरणाला लष्कर विरूद्ध पोलिस किंवा लष्कर विरूद्ध नागरी प्रशासन असा रंग देण्याचा प्रयत्न करू नये. गेल्या 2 नोव्हेंबरला घडलेली ही घटना दुर्देवी होती आम्ही ती सामोपचाराने मिटवू असे ते म्हणाले. अशा घटनांमुळे दोन्ही महत्वाच्या संस्थांची बदनामी होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सीतारामन या दिवाळी निमित्त अरूणाचल सरहद्दीवरील जवानांना भेटण्यासाठी तिकडे गेल्या आहेत. बोंबदिला येथे बुद्ध महोत्सव साजरा केला जात असताना तेथे काही लष्करी जवानांनी नागरीकांशी असभ्य वर्तन केल्यानंतर पोलिसांनी तेथे हस्तक्षेप केला. त्यावेळी पोलिस आणि जवानांमध्येच हाणामारी झाली. पोलिसांनी दोन लष्करी जवानांना ताब्यात घेतल्यानंतर अन्य लष्करी जवानांनी पोलिस ठाण्यावरच हल्ला करण्याची घटना घडली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
3 :cry: Sad
6 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)