अरुण जेटली लवकरच अर्थमंत्री म्हणून पुन्हा पदभार स्विकारणार

नवी दिल्ली – मुत्रपिंडाच्या आजारावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर केंद्रीयमंत्री अरुण जेटली पुन्हा एकदा अर्थमंत्रीपदाचा पदभार स्विकारणार आहेत. त्यामुळे या महिन्यांतच ते नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात पुन्हा एकदा रूजू होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर 2014मध्ये अरुण जेटली यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना सुटी घ्यावी लागली होती. दरम्यानच्या काळात नॉर्थ ब्लॉकमधील त्यांच्या अर्थ खात्याच्या कार्यालयाचे नुतनीकरण आणि स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे संसर्गाचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. संसर्ग टाळण्यासाठी डॉक्‍टरांनी त्यांना तीन महिने सर्वांपासून दूर राहण्याचा दिलेल्या सल्ल्याचा कालावधीही आता संपल्याने ऑगस्टच्या मध्यापर्यंत ते कामावर रुजू होतील.

दरम्यान, काही आठवड्यांपासून जेटली सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह आहेत. विरोधकांनी जीएसटीवरुन उपस्थित केलेल्या मुद्‌द्‌यांना त्यांनी उत्तरेही दिले आहेत. जेटली यांच्या अनुपस्थितीत रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्यावर अर्थ खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)