अरुण जावळे विचार गौरव पुरस्काराने सन्मानित

औरंगाबाद :माधव बोरडे यांच्या हस्ते विचार गौरव पुरस्कार स्वीकारताना अरुण जावळे शेजारी उपस्थित मान्यवर.

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) – नव्या पिढीचे नेतृत्व करणारा आजचा विद्यार्थी टिकला व घडला पाहीजे तरच राष्ट्र टिकू आणि सक्षमपणे घडू शकेल असा विचार विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, औरंगाबाद येथे बहुजन विचार मंचच्या वतीने अरुण जावळे यांना पंचवीस हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह अशा स्वरुपाचा “विचार गौरव पुरस्कार’ माधव बोरडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात अरुण जावळे बोलत होते.
बहुजन विचार मंचचे प्रमुख डॉ. विलास जोंधळे यांनी प्रास्ताविक केले. अरुण जावळे यांच्या या प्रयत्नांमुळे निश्‍चितपणे एक चांगला दिशादायक विद्यार्थी दिवस हा उपक्रम हाती आला आहे असे ही त्यांनी सांगीतले.
चेतन शिंदे यांनीही आपल्या भावाना व्यक्त केल्या. ते म्हणाले, विद्यार्थी दिवासाचे गांभीर्य आणि महत्त्व हे केवळ महाराष्ट्र सरकारपुरतेच राहीले पाहीजे किंवा शासनानेच राखलं पाहीजे असे अजिबात होता कामा नये. याउलट हा दिवस महाराष्ट्राचा उत्सव झाला पाहीजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहायला हवे.
यावेळी डॉ. राहूल म्हस्के, श्रावण गायकवाड यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)