सातारा दि.23 -विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक साहित्यिक अरुण जावळे यांना औरंगाबाद येथील बहुजन विचार मंचच्या वतीने ‘विचार गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून शनिवार दि 24 नोव्हेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु बी. ए. चोपडे यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण ‘विचार जागर परिषदेत’ करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, रोख रक्कम पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या चळवळीतील पत्रकार अरुण जावळे यांचे योगदान दखलपात्र आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि क्रांती, सत्यनारायण व्हर्सेस संविधान, पडघम सांस्कृतिक निष्ठांतराचे, हिंदू एक चकवा अशी त्यांची बहुचर्चित पुस्तके आहेत. मंदिराच्या छतावरून लहान मुलांना झोळीत टाकण्याची अघोरी प्रथा, शिव्यांचा उत्सव, मंदिर प्रवेश यासंदर्भात अरुण जावळे सतत भाष्य करत आलेत. सातारा येथील ज्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी नोव्हेंबर रोजी इयत्ता पहिलीत (इंग्रजी ) प्रवेश घेतला त्या शाळेत तब्बल पंधरा वर्षे शाळा प्रवेश दिन साजरा करुन या शाळा प्रवेश दिनाचे महत्त्व शासनाच्या आणि महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून देण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केलंय.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे शनिवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता विचार जागर परिषदेत हा पुरस्कार दिला जाणार असून यावेळी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु बी.ए. चोपडे, बहुजन विचार मंचचे ×ड. विलास जोंधळे, संत कबीर शिक्षण संस्थेचे संस्थापक, माधव बोरडे, पीपल्स पोस्टचे संपादक चेतन शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, औरंगाबाद झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, प्रा. राहूल म्हस्के, न्यायाधीश डी.आर. शेळके आदी मान्यवरांची उपस्थिती आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा