अरुण अडसड यांनी घेतली विधानपरिषद सदस्यपदाची शपथ

मुंबई: माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषद सदस्यपदी अरुण जनार्दन अडसड यांची निवड झाली होती. विधानभवनातील सभापतींच्या दालनात विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी  अरुण अडसड यांना विधानपरिषद सदस्यपदाची शपथ दिली.

अरुण अडसड हे दोन वेळा विधानसभेचे सदस्य होते. तसेच ते विदर्भ औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्षही होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, आमदार सर्वश्री आकाश फुंडकर, भाई गिरकर, मनीषा चौधरी तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, अवर सचिव उमेश शिंदे, रवींद्र जगदाळे, बाबा वाघमारे आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)