अरुणा मिलर अमेरिकेच्या खासदार होणार

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह ‘हाउस ऑफ रिप्रझेंटेटिव्हसाठी मेरीलँड मतदारसंघातून भारतीय वंशाच्या अरुणा मिलर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. 26 जून रोजी 6व्या मेरीलँड प्राथमिक निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीच्या सदस्या असणाऱया मिलर स्वपक्षीय डेव्हिड ट्रोन यांना आव्हान देणार आहेत.

प्राथमिक निवडणुकीत अरुणा यांनी विजय मिळविल्यास मेरीलँड मतदारसंघात त्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी त्या डेमोक्रेटिक उमेदवार ठरणार आहेत. त्यांनी निवडणूक प्रचारासाठी समर्थकांकडून 1.36 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 9.26 कोटी रुपये) जमविले आहेत. खासदार म्हणून अरुणा निवडून आल्यास प्रमिला जयपाल यांच्यानंतर अमेरिकेच्या संसदेत प्रवेश करणाऱया त्या दुसऱया भारतीय महिला ठरतील. 2016 मध्ये प्रमिला यांना युएस हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सदस्या म्हणून निवडण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पक्षासाठी निधी जमविण्यास अरुणा यांची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे. परंतु त्यांनी डेमोक्रेट पार्टीचे सदस्य ट्रोन यांच्या तुलनेत कमी खर्च केला आहे. ट्रोन यांनी प्रचाराकरता 10 दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत. या  लढतीवर अमेरिकेतील सर्व प्रसारमाध्यमांच्या नजरा केंद्रीत झाल्या आहेत.  मेरीलँड मतदारसंघ वॉशिंग्टन क्षेत्रात मोडतो, या क्षेत्रावर डेमोक्रेटिक पार्टीचे वर्चस्व असल्याचे मानले जाते.

हैदराबादमध्ये जन्मलेल्या अरुणा 1972 मध्ये अमेरिकेत दाखल झाल्या. 2010 मध्ये मेरीलँड स्टेट डेलिगेट म्हणून त्यांची निवड झाली होती. यंदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या नागरिकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)