अरुणाचल प्रदेशात भूस्खलनामुळे 4 जवान ठार 8 जखमी

ईटानगर(अरुणाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेशात झालेल्या भूस्खलनाने आयटीबीपी (इंडो तिबेट बॉर्डर पोलीस) चे चार जवान मरण पावल्याची आणि आठ जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भूस्खलनाची ही दुर्घटना लोअर सियांग जिल्हा मुख्यालयापासून सुमारे पाच किमी अंतरावर दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

आयटीबीपीच्या 20 जवानांना घेऊन एक मिनीबस बसरहून वेस्ट सियांगला जात होती. बसर-अकजान मार्गावर मुसळधार पावसामुळे एक खडक येऊन मिनिबसवर आदळ्ला. त्यामुळे बसमधील चार जवानांचा जागेवरच मृत्यू झाला. अन्य आठ जवान जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांची अवस्था गंभीर आहे. जखमींना लिकाबाली येथील लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या पाच दिवसात भूस्खलनामुळे घडलेली ही दुसरी दुर्घटना आहे. 24 जून रोजी झालेल्या भूस्खलनात पाच मजूर मरण पावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)