अरुणाचलच्या सीमेजवळ चीनचा युद्धसराव  

नैऋत्य चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशामध्ये, समुद्रसपाटीपासून 5 हजार मीटर उंचीवरच्या पठारावर हा युद्धसराव घेण्यात आल्याचे पीपल्स लिबरेशन आर्मीने म्हटले आहे. हा युद्धसराव तब्बल 11 तास चालला होता. इतक्‍या उंचीवरच्या युद्धासाठी सैन्याची क्षमता तपासण्यासाठी हा युद्धसराव केला गेल्याचे “पीएलए’ने म्हटले आहे.

“पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या पायदळाच्या तुकड्या आणि तिबेट प्रादेशिक कमांडने या युद्धसरावामध्ये भाग घेतला. यामध्ये वेगवान हालचाली, मल्टी युनिट जॉईंट स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांपासून संरक्षणाचा सराव केला गेला, असे “चायना डेली’ या सरकारी माध्यमाने “पीएलए’च्या हवाल्याने म्हटले आहे.

सीसीटिव्हीच्या चित्रीकरणाच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार तिबेट कमांड ब्रिगेडने ब्रम्हपुत्रा नदीच्या मध्य आणि सखल भागात युद्धसामुग्रीही तैनात केली आहे. उपलब्ध झालेल्या व्हिडीओनुसार येथील चीनी सैनिक रणगाडाभेदी ग्रेनेड आणि रॉकेटही हाताळत आहेत. शत्रुची विमाने ओळखणारी रडार आणि विमानभेदी यंत्रणाही सज्ज असल्याचे समजते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)