अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांची कसरत

मलकापूर येथील कोयना वसाहतीमधील परिस्थिती
सातारा – कराड तालुक्‍यातील मलकापूर नगरपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या कोयना वसाहतीतील रस्ते अत्यंत लहान आहेत. या अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, नगरपंचायत हद्दीतील अरुंद रस्ते रुंद करण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांमधून होत आहे.

मलकापूर नगरपंचायतीला नुकताच नगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय खलही झाला. सध्या मलकापूर नगरपंचायत हद्दीत वास्तव्य करत असणाऱ्या नागरिकांना आशा आहे ती केवळ चांगल्या सुविधा मिळाव्यात या गोष्टीची. विशेष म्हणजे मलकापूर हद्दीतील कोयना वसाहतीतील रस्ते अतिशय अरुंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गुरुवारी कोयना वसाहतीत एक ट्रक आला होता. अरुंद रस्त्यामुळे ट्रक वळवत असताना चालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. ट्रक वळवत असताना ट्रक रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात गेल्याने चांगलाच अडकून पडला. या प्रकारामुळे वसाहतीतील नागरिकही वैतागून गेले. तसेच रस्त्यातच ट्रक अडकल्याने इतर वाहनधारकांचीही काही काळ कोंडी झाली. या प्रकारामुळे वैतागून गेलेल्या नागरिकांनी अप्रत्यक्ष नगरपंचायत प्रशासनाच्या नावाने बोटे मोडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अरुंद रस्ते रुंद करण्याची मागणी
मलकापूर नगरपंचायतीला आता नगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. मात्र, येथील नागरिकांना त्याप्रमाणे सुविधाही दिल्या जाव्यात, अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे. नुकतेच मलकापुरातील कोयना वसाहतीत अरुंद रस्त्यामुळे ट्रक नाल्यात गेल्याचा प्रकार घडला. यामुळे प्रशासनाने शहाणपण घेऊन किमान गरजेच्या ठिकाणी तरी रस्त्याची रुंदी वाढवण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)