अरुंद मोऱ्यांमुळे अपघाताचा धोका

जोगवडी- भोर-कापूरहोळ मुख्य रस्त्यांवर असलेल्या अरुंद मोऱ्यांमुळे आणि मोऱ्यांच्या ठिकाणी फूटपाथ नसल्यामुळे येथील वाहतुकीस धोका निर्माण झाला असून, वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. अशा ठिकाणी दोन अवजड वाहने समोरासमोर आल्यास बिकट परिस्थिती निर्माण होत असून, अपघाताची शक्‍यता वाढत आहे आणि वाहन चालकांमधे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या मार्गावर रस्ता रुंदीकरण होण्याची मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिक करीत आहेत.
भोर-कापूरहोळ मुख्य रस्ता भोर-महाड ते पुणे-सातारा महामार्गाला जोडणारा असल्याने या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावर कापूरहोळ ते संगमनेर एस. टी. थांबा आठ किलोमीटर अंतरावर असून, या ठिकाणी 16मोऱ्या आहेत; परंतु येथे फूटपाथ नसल्याने वाहन चालवताना रस्ता अपुरा पडत आहे, त्यामुळे अपघाताची शक्‍यता निर्माण होत आहे. अपुऱ्या रस्त्यामुळे वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. भोर तालुक्‍यात अनेक किल्ले असून, दोन धरणे आहेत. सुटीच्या दिवशी या रस्त्यावर वर्दळीचे प्रमाण वाढत असते. बाहेरील वाहन चालकांना वाहन चालवताना मोरी लक्षात न आल्याने सतत अपघात होण्याचे प्रकार होत असतात. या रस्त्यावरून दररोज शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही ये-जा होत असते. मात्र, त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहेत. अशा ठिकाणी मोऱ्याची रुंदी वाढवणे गरजेचे आहे, तसेच रस्त्याचे रुंदीकरण व्हावे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालक करीत आहेत.

  • 2016 मध्ये रस्त्याच्या प्रस्तावाला मंजुरी
    हायब्रिड ऍम्मुनिटीअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये यवत ते सासवड या रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे डिसेंबर 2016 मध्ये सादर करण्यात आला होता; परंतु सदरील प्रस्तावास मंजुरी अप्राप्त आहे, हा प्रस्ताव डिसेंबर 2018 च्या पुरवणी अर्थसंकल्पात पुन्हा सादर करण्यात येणार आहे. या रस्त्यातील दुसरा टप्पा सासवड ते कापूरव्होळ मंजूर असून, नोव्हेंबर डिसेंबरअखेर काम चालू होण्याची शक्‍यता आहे आणि तिसरा टप्पा कापूरहोळ ते भोर या लांबीतील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पुढील म्हणजे जुलै 2018 मध्ये सादर करण्यात येणार आहे. सासवड ते कापूरहोळ रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर, तर वळणाच्या ठिकाणी आणि गरजेनुसार साडेपाच मीटर ते दहा मीटर एवढी असणार आहे.
    -आर. एल. ठाणगे, सहायक अभियंता, बांधकाम विभाग शाखा, भोर
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)