अरिजित सिंहबरोबर गायला सोना महापात्राचा नकार

सोना महापात्रा ही गायिका लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यसाठी नेहमीच तऱ्हेवाईक वक्‍तव्ये करत असते. अलिकडेच तिने अरिजित सिंहबरोबर गाणे म्हणण्याची एक ऑफर सपशेल नाकारली आहे. खरे तर हे पूर्ण गाणे अरिजितला म्हणायचे होते आणि सोनाला गाण्याच्या अखेरच्या चार ओळी म्हणायच्या होत्या. तिला जेंव्हा हे समजले तेंव्हा तिने स्टुडिओतून निघून जाणेच पसंत केले.

याबाबत मिडीयाशी बोलताना तिने सांगितले की, असे गाणेच मला म्हणायचे नाही. हे एक “लव्ह सॉंग’ होते, तरी पुरुषाला पूर्ण गाणे म्हणायला मिळते आणि गायिकेला मात्र चार ओळी गायला दिल्या जातात हे विचित्र आहे, असे ती म्हणाली. ज्या देशामध्ये लता मंगेशकर सारख्या गायिकेने राज्य केले आहे.

90 च्या दशकात त्यांच्याशिवाय कोणत्याच सिनेमाचे प्लेबॅक होत नसे. त्याच देशात आता गायिकांना डावलले जाते आहे. आता 10 पैकी 8 गाणी पुरुष गायकांसाठीच बनवली जातात. पण मी पडती बाजू स्वीकारणार नाही. मी जी गाणी गायली आहेत, ती सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होती. म्हणून स्वतःला श्रेष्ठ कलाकार समजते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)