अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमध्ये वाढ

अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांचा सुधारित सण अग्रीम

मुंबई: राज्य शासनाने अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सण अग्रिमात वाढ केली असून आता हा अग्रीम १२ हजार ५०० रुपये एवढा राहील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

१ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४८०० पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हा सण अग्रीम अनुज्ञेय राहील. तो दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवत्सरी, रोश-होशना, वैशाखी पौर्णिमा (भगवान बुद्ध जयंती) प्रजासत्ताक दिन, डॉ. आंबेडकर जयंती या सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठी मिळू शकेल. हा आदेश दि. २३ ऑक्टोबर २०१८ पासून म्हणजेच शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून अंमलात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)