अराजकाचे राजकीय समिकरण लोक नाकारतील – जेटली

नवी दिल्ली – काही अधीर राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन जे नवीन राजकीय समिकरण मांडण्याचा प्रयत्न केला आहे ते अराजक माजवणारे गठबंधन असून देशातील लोक ही राजकीय फेरजुळणी अमान्य करतील असा विश्‍वास अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केला आहे. या वर्षीच्या राजकीय सारीपाटावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध अराजकीय कॉम्बीनेशन असाच सामना रंगणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या किडनी रोपण शस्त्रक्रियेमुळे रूग्णालयात असलेले जेटली यांनी आपल्या फेसबुक पेज वर या संबंधात ही प्रतिक्रीया दिली आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधीनिमीत्त देशातील बहुतेक सर्व महत्वाच्या राजकीय नेत्यांनी एकीचे प्रदर्शन घडवले होते त्यावरच त्यांनी प्रामुख्याने भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की यातील काही नेते सोयीनुसार आपले राजकीय तत्वज्ञान बदलतात तर काहींना असे एकीचे राजकारण करणे ही त्यांची गरज असते. त्यांच्या पैकी अनेकांशी विशेषत तृणमुल कॉंग्रेस, द्रमुक, टीडीपी, बीएसपी, जेडीएस अशा पक्षांशी भाजपने या आधी सरकारे चालवली आहेत. हे राजकीय पक्ष त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या भूमिक बदलत असतात असे त्यांनी म्हटले आहे.

लोकशाहीवादी आणि आशावादी समाजात अराजक माजवणाऱ्यांचे स्वागत केले जात नाही. अराजक टाळून चांगले गव्हर्नन्स देणारे सरकारच शक्तिशाली देश उभारणी करू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कारकिर्दीचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की या चार वर्षात मोदींनी घोटाळा मुक्त सरकार दिले आहे आणि शेवटच्या वर्षात आम्ही आमचे धोरण आणि कार्यक्रम आणखी मजबुतीने राबवू. चांगले राजकारण, चांगली अर्थव्यवस्था आणि वाढलेला सामाजिक आधार या जोरावर आम्ही अधिक मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेवर येऊ असा दावाही जेटली यांनी आपल्या पोस्ट मध्ये केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)