अरविंद एज्युकेशन सोसायटीत 1200 विद्यार्थ्यांना रुबेला लसीकरण

सांगवी -रुबेला व गोवर लसीकरण मोहिमेअंतर्गत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात रुबेला लसीकरण राबविण्यात आले. यावेळी नर्सरी ते दहावी पर्यंतच्या बाराशे विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे आदींसह शिक्षकवृंद, महापालिका रुग्णालयाच्या आरोग्य सेविका आदी उपस्थित होते.

या लसीकरणाविषयी जनजागृती निर्मा करण्यासाठी शाळा प्रशासनाने पालकांनाही शाळेत बोलावून घेतले होते. त्यांना लसीकरणाविषयी आणि रुबेला रोगाविषयी माहिती देण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टीमच्या माध्यमातून शाळेमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. त्यामुळे या लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याची पालक आणि विद्यार्थ्यांची मनातील भीती दुर झाली.

या लसीकरणाबाबत आरती राव म्हणाल्या, की पालक सकारात्मक असल्याने लस देण्यात कोणतीही अडचण आली नाही. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास जाणवला नाही. आरोग्य सेविकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची पाहणी केली जात होती. पालकांनी शाळेवर पूर्ण विश्वास ठेवल्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
69 :thumbsup:
56 :heart:
15 :joy:
0 :heart_eyes:
26 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)