अरमान कोहलीविरोधात आणखी एक “एफआयआर’

अरमान कोहलीविरोधात त्याच्या मैत्रिणीने, वीरू रंधवाने मारहाणीची तक्रार काही दिवसांपूर्वी दाखल केली होती. आता अरमानच्या विरोधात आणखी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. नादिया अली नावाच्या या महिलेने अरमान, त्याचा मित्र दिलीप राजपूत आणि त्याचा नोकर दिलीप या तिघांच्या विरोधात “एफआयआर’ दाखल केली आहे. अरमान आणि दिलीपने आपल्याकडून 50 लाख रुपये घेतले होते आणि ते पैसे परत करण्यास टाळाटाळ करायला लागले होते. जेंव्हा आपण पैसे परत मागितले तेंव्हा अरमान आणि दिलीपने आपल्याला धमकावले आणि फिजीकली दुखापतही केली, अशी तक्रार नादियाने पोलिसांकडे नोंदवली आहे.

महिलांशी गैरवर्तन करण्याबद्दल अरमान कुप्रसिद्ध झाला आहे. “बिग बॉस’च्या 7 व्या सीझनदरम्यान काजोलची बहिण तनिषा मुखर्जी आणि अरमानमध्ये जवळीक वाढली होती. त्यांच्या प्रमाणापेक्षा जवळ येण्याबाबत खूप गॉसिप व्हायला लागले होते. याच “सो कॉल्ड’रिलेशनशीपदरम्यान तनिषा आणि अरमानचे भांडण झाले होते. अरमान तनिषावर हात देखील उचलत असे. तिसऱ्यावेळी अरमानने तनिषावर हात उचलला तेंव्हा तिनेही त्याला सणसणीत थप्पड लगावली होती. त्यानंतर तान्या सिंहबरोबरही त्याचे रिलेशन होते, अशी चर्चा होती. तिच्याशीही त्याचे भांडण झाले होते. “तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील मूनमून दत्ताबरोबरही हीच स्टोरी रिपीट झाली होती.

“बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या सोफिया हयातने अरमान विरोधात मारहाणीची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. आयेषा झुल्काबरोबरचे त्याचे अफेअर तर प्रसिद्धच आहे. अरमानबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याने आयेषाने बिग बजेट सिनेमे स्वीकारायला नकार दिला होता. पुढे दोघांमध्ये ब्रेक अप झाला. दरम्यानच्या काळात आयेषाचे बॉलिवूड करिअरच समाप्त झाले. 1992 पासून बॉलिवूडमध्ये असलेल्या अरमानला डझनभर बी ग्रेड सिनेमांशिवाय काहीही करता आलेले नाही.

वीरू रंधवाच्या तक्रारीनंतर अरमान कोहली काही दिवस फरार होता. नंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्याला काही दिवस तुरुंगाची हवाही खायला लागली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)