युरोप-अमेरिकेला शह देण्याचा डाव
बीजिंग (चीन) – चीनने अरब राष्ट्रांना 2300 कोटी डॉलर्स (सुमारे दीड लाख कोटी रुपये) ची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. अरब राष्ट्रांवर असलेला अमेरिका आणि युरोपमधील देशांचा प्रभाव कमी करून आपला दबदबा निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी ही घोषणा केली आहे. अरब राष्ट्राना स्वस्त कर्ज आणि मानवतावादी दृष्टीने मदत करण्यासाठी 2300 कोटी डॉलर्सची मदत चीन करणार आहे. चीनमध्ये आयोजित अरब राष्ट्रांच्या नेत्यांच्या संमेलनात शी जिनपिंग बोलत होते.

2300 कोटी डॉलर्सच्या आर्थिक मदतीशिवाय येमेन, जॉर्डन आणि लॅबेनॉनला मानवातावादी मदतीसाठी 9 कोटी डॉलर्स, इतर परियोजना पूर्तीसाठी 15.1 कोटी डॉलर्स राष्ट्रांना देण्यात येणार आहेत. मात्र या रकमा कशा आणि कधी देण्यात येणार आहेत या बाबत जिन पिंग यानी काही माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)