अरबी समुद्रातील शिवस्मारक उभारणीत भ्रष्टाचार ! आमदार मेटेंचे मुख्यमंत्र्यांना पाच पानी पत्र

शिवस्मारक उभारण्यासाठी कंत्राटदार नेमणे हा शिवरायांचा व राज्यातील 11 कोटी शिवप्रेमी जनतेचा अवमान ! धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी ५ पानी पत्राव्दारे केला आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असून या सर्व प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी; अन्यथा या अधिकाऱ्यांवर विधिमंडळात हक्‍कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा मेटेंनी दिला आहे. दरम्यान विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील हे पत्र सोशल मीडियावर शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पत्रानुसार शिवस्मारकाची निविदा प्रक्रिया बेकायदेशीर असून त्यात आर्थिक देवाणघेवाणीचा उल्लेख आहे. म्हणजेच सदरचे पत्र निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचे दिशानिर्देश करते. मेटे यांच्या म्हणण्यानुसार सदरची बाब मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून देखील मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कारवाई न करणे देखील धक्कादायक असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

अशा बेकायदेशीर व भ्रष्ट निविदा प्रक्रियेद्वारे शिवस्मारक उभारण्यासाठी कंत्राटदार नेमणे हा शिवरायांचा व राज्यातील 11 कोटी शिवप्रेमी जनतेचा अवमान आहे.त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया सुरू केली पाहिजे तसेच व संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

https://www.facebook.com/DPMunde/posts/2254689144760703

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)