अरबाझ खान दुसऱ्या लग्नाच्या तयारीत

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाच्या तयारीच्या बातम्या यायला लागल्या आहेत. रनवीर- दीपिका आणि रणबीर- आलियाचीही लग्नाची तयारी सुरू झाली आहे. आता सलमान खानचा भाऊ अरबाझ खान हा देखील आपल्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागला आहे, असे समजते आहे.

अरबाझची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रीयानीबरोबर अरबाझच्या संसाराराची चित्रे आता खूप रंगवली जायला लागली आहेत. खान परिवाराशी संबंधित काही माहितगारांनी ही माहिती दिली आहे. मात्र अरबाझ खान आणि जॉर्जियाच्या कुटुंबीयांकडून या बातमीचे समर्थन अद्याप झालेले नाही. अरबाझ आणि मलायका अरोरा हे 2017 मध्ये विभक्‍त झाले आहेत. पण त्यांच्यातला घटस्फोट होण्यामागचे कारण अरबाझकडे फारचे चांगले करिअर नाही, असे खान कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

स्वतःच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मलायकाने अरबाझबरोबर केवळ एकाच कारणासाठी लग्न केले होते, ते म्हणजे तो सलमानचा भाऊ आहे. अरबाझने स्वतःची ओळख निर्माण करण्याऐवजी सुपरस्टार भाऊ सलमानवरच विसंबून रहायला सुरुवात केली. म्हणूनाच मलायका त्याला सोडून गेली आणि याच कारणास्तव अरबाझच्या दुसऱ्या लग्नाला त्याच्या कुटुंबीयांकडून म्हणावा तसा पाठिंबा नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)