अरनॉल्ड, स्मिथ आणि ग्रेगरी विंटर यांना रसायनशास्त्रातील नोबेल 

प्रोटीन आणि एन्झामाईन विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी निवड 
स्टॉकहोम: “द रॉयल स्वीडिश ऍकॅडमी ऑफ सायन्सेस’ या संस्थेकडून बुधवारी रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यात फ्रान्सिस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी. विंटर या तीघांना हा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. गेल्या वर्षीचा म्हणजेच, 2017 सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॅकस डुबोचेट, जोकीम फॅंक आणि रिचर्ड हेंडरसन या तिघा शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला होता.
अमेरिकेतील फ्रान्सिस अरनॉल्ड यांनी एन्झामाईन बनविण्याची थेट प्रक्रिया शोधून काढली आहे. अशापद्धतीने तयार केलेले एन्झामाईन जैविक इंधनापासून फार्मास्युटीकलमध्ये वापरण्यात येतील. यासोबतच स्मिथ आणि विंटर यांनीही अनुक्रमे प्रोटीन निर्मिती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्‍यक असणारा घटक बनविण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान, काल भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार आर्थर अश्‍किन, जेरार्ड मॉरो आणि डोना स्ट्रिक्‍लन्ड यांना जाहीर झाला आहे. भौतिकशास्त्रातील अमूल्य कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. या तिन्ही वैज्ञानिकांनी लेजर तंत्रज्ञान क्षेत्रात बहुमूल्य संशोधन केले आहे.त्याआधी सोमवारी, मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संशोधक जेम्स पी. ऍलीसन आणि तासुकू होन्लो यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. करोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्लीमध्ये सोमवारी 2018 च्या मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी जेम्स पी. ऍलीसन आणि तासुकू होन्लो यांची निवड करण्यात आली.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)