अरणगाव येथे स्पर्धा परीक्षा शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर – अवतार मेहेरबाबा विद्यालय अरणगाव आणि ग्रामपंचायत अरणगाव यांच्या संयुक्‍त विद्यमाने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा कार्यक्रम अवतार मेहेर बाबा विद्यालय अरणगाव येथे पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना एसटीआय डोंगरे, पिंपळे यांनी मार्गदर्शन केले.

अरणगावमधील सर्व विद्यार्थी शिक्षित उच्चशिक्षित पालक तसेच ग्रामस्थ यांना स्पर्धा परीक्षा आणि त्याबद्दल आपण आजपासून करावयाची तयारी यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी 8 वी ते 10 वीचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)