अय्यप्पा मंदिरात मंडल महापूजा; दिव्यांनी, फुलांनी मंदिर निघाले उजळून

नगर: सावेडीतील शबरी कॉम्प्लेक्‍स मधील श्री अय्यप्पा मंदिराचा रौप्य महोत्सव होत असून चालू असेलेल्या 60 दिवसांच्या मंडल ,मकर पूजा उत्सवात मंडलपूजा मोठ्या उत्साहात झाली . श्री अय्यप्पा स्वामीना मानणारा मोठा वर्ग नगरमध्ये आहे.

उद्योजक के के शेट्टी व विनया शेट्टी हे दांपत्य नगर मध्ये 35 वर्षापासून मंडला महापूजा उत्सव करतात. शेट्टी हे नगरमध्ये राहण्यास आल्यावर पहिले 10 वर्ष त्यांनी घरी हा उत्सव साजरा केला नंतर सावेडी येथे अय्यप्पा मंदिरासाठी जागा घेवून भाविकानी मंदिराची उभारणी केली तेव्हा पासूनयेथे हा 41 वा दिवसाचा मंडल महापूजा उत्सव शेट्टी कुटूंबीय व अय्यप्पा सेवा समितीच्या वतीने साजरा करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केरळ मधील शबरीमलयच्या मुख्य उत्सवाचा धर्तीवर हा उत्सव नगर मध्ये केला जातो. उत्सावानिम्मित पहाटे महागणपती हवन झाले,दुपारी महिला व पुरुष भाविकांनी मंदिर परिसर फुलांनी सजविला संध्याकाळी प्रोफेसर कॉलनी जवळील महालक्ष्मी मंदिर ते अय्यप्पा मंदिर अशी सावेडीतून भव्य शोभायात्रा(तालापोल्ली) काढण्यात आली यामध्ये महिलानी मोती कलरच्या साड्या परिधान करून हातात फुलांनी सजवलेली ताट व त्यामध्ये अर्धा नारळ दिवा प्रज्वलित करतात, ही तालापोल्ली पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती तर मंदीर परिसर फुलांनी व दिव्यांनी उजळून निघाला. नंतर दीपआराधना झाली.

देवाची आरती नंतर पुष्पभिषेक करण्यात आला ,याप्रसंगी मंदिरातील वातावरण प्रसन्न होते.नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद(गोड जेवण)देण्यात आला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. शेवटी हरी वरासम होऊन एक एक दिवा बंद करून अंधार करण्यात आला.हे दृश्‍य अतिशय मनमोहक होते. अय्यप्पा सेवा समितीने आयोजित केलेल्या या दोन महिन्याचा उत्सवात रोज पूजा व महाप्रसाद असतो. 14 जाने ला मकर वीलक्कु उत्सवाने सांगता होणारआहे.

त्याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष के के शेट्टी,उपाध्यक्ष-पी श्रीधरन,सेक्रेटरी-के शंकर,सहसेक्रेटरी-रामचंद्रन नायर,खजिनदार-टी पी बालकृष्णन,कार्यकारणी सदस्य-के पिल्लाई,सुदर्शन मेनन,के एस बोस,वेणुगोपाल,राजू लक्ष्मण,अरुण नायर,सुरेश कुमार,के मणियप्पन,प्रेम शेट्टी,के डी राव,प्रभाकरन नायर,एस वसंत तसेच सल्लागार मंडळ बाबूशेठ टायरवले,मोहन मानधना,दिनेश आगरवाल,के आर गणेश,रत्नाकर शेट्टी,लिबेश नायर,चंद्रकांत रेणावीकर व अय्यप्पा सेवा सेमितीच्या पदाधिकारी तसेच भक्त मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)